औरंगाबाद : झरीनची एक झलक पाहण्यासाठी तरुणांमध्ये हाणामारी

0

औरंगाबाद : एका उद्धाटन समारंभासाठी शहरात आलेल्या अभिनेत्री झरीन खानसाठी तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. झरीनची एक झलक पाहण्याची तरुणांमध्ये जुंपली होती. तिला जवळून पाहण्याचा हट्ट करणा-या एका चाहत्याला झरीनने कानशिलात लगावली असेही तिथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले. ही घटना कॅनॉट गार्डन परिसरात शुक्रवारी (दि. 14) घडली.


या घटनेमुळे झरीनला दोन तास कार्यक्रमाच्या ठिकाणी अडकवून राहावे लागले. यावेळी उद्घाटन समारंभासाठी शोरुममालकाने कुणलाही बंदोबस्त न घेता केवळ खासगी बाऊन्सरच्या मदतीने गर्दी सावण्याची तयारी केली होती. झरीनला पाहण्यासाठी कॅनॉट परिसरात बरीच गर्दी झाली होती. यावेळी तरुणांमध्ये बाचाबाची सुरु झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या वादातून तरुणांनी कॅनॉटमधील उभ्या असलेल्या गाड्या फोडल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.