युवक काँग्रेसचे ‘कहां गये 20 लाख करोड?’ आंदोलन

मोदींचे वीस लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची टीका

0

मुंबई : अर्थव्यवस्थेत नोकरदार हा मोठा उपभोक्ता वर्ग असून मागणी जिवंत ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने जर थेट आर्थिक मदत केली असती तर अर्थव्यवस्था मंदावली नसती. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असून त्यांचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.

तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘कहां गये वो २० लाख करोड?’ या अनोख्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कामगार व नोकरदार यांच्याशी संवाद साधून २० लाख कोटींच्या पॅकेजबद्दल त्यांची मते जाणून घेतली. नोकरदार वर्गाला काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची खासगी, कॉर्पोरेट क्षेत्र व कामगार वर्गात विशेष नाराजी असल्याचे समोर आले आहे. या वेळी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून नोकरदार वर्गाच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. बेरोजगार झालेल्या युवकांना २० लाख कोटी रुपयांतून काय मदत मिळाली? याचा आढावा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उद्या घेणार असून १४ तारखेला भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत त्यांना जाब विचारणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.