युवक काँग्रेस कृषी कायद्यांच्या विरोधात उतरले मैदानात…!

औरंगाबादमध्ये क्रांती चौकात युवक काँग्रेसचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा आणि कृषी कायद्यास विरोध

0

औरंगाबाद : औरंगाबादमधील क्रांती चौक या ठिकाणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमून त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.  सध्या नवी दिल्ली येथे कृषी विधेयक कायद्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.आज या आंदोलनाचा १२ वा दिवस असून उद्या शेतकऱ्यांनी भारत बंद ची हाक दिली आहे.

नवी दिल्ली येथे कृषी विधेयक कायद्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.आज या आंदोलनाचा १२ वा दिवस असून उद्या शेतकऱ्यांनी भारत बंद ची हाक दिली आहे.  या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन आणि कृषी कायद्याला विरोध करत औरंगाबादमधील क्रांती चौक येथे युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. केंद्र सरकार जोपर्यंत कृषी कायदे रद्द करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा युवक काँग्रेसने दिला. जोपर्यंत कायदे रद्द केले जाणार नाहीत. तोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतील. असा इशारा केंद्र सरकारला आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.