20 पानी सुसाइड नोट लिहून, गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटमध्ये लिहिली फौजदार, तहसीलदाराचे नाव

0

औरंगाबाद : सुमारे 20 पानी सुसाइड नोट लिहून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. साहेबराव याने आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत साडीच्या साह्याने गळफास घेतला. या प्रकरणी हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

साहेबराव नामदेव देशटवाड ( वय 29 रा. टी.व्ही. सेंटर चौक, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सुसाइड नोटमध्ये मित्र, मैत्रिण, पोलिस उपनिरीक्षक, तहसीलदार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी छळ केला व मित्र-मैत्रिणींनी ब्लॅकमेल केल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिलेले आहे.  मृत साहेबराव यांचे वडील पैठण येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर रेशनकार्ड संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये एकूण पाच आरोपी आहेत. त्यामध्ये दोन तहसीदारांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या प्रकरणात देशटवाड यांना निलंबित करण्यात आलले आहे. या प्रकरणाचा तपास पैठण पोलिस करत आहेत. 12 सप्टेंबरला पैठण पेलिस स्टेशनमधील फौजदार दोन कर्मचाऱ्यांसह देशटवाड यांच्या घरी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच मृताच्या आईला बाथरुममधून हात धरून बाहेर अोढले, असा आरोप करण््यात आला आहे. मृत साहेबराव याचे एका तरुणीसोबत संबंध होते. ती तरुणी मित्राच्या साह्याने मृत तरुणाला वारंवार पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करत होती. तरुणीने मृताच्या खात्यातूनही सर्व रक्कम काढून घेतली होती. या विवंचनेतून मृत साहेबरावने एका डायरीत 20 पानी सुसाइड नोट लिहिली आहे. त्यात तीन ते चार मित्रांची नावे, ज्या तरुणीसोबत संबंध होते तिचे नाव, पैठण पोलिस स्टेशनमधील एका फौजदाराचे नाव आणि वडिलांसोबत गुन्ह्यात असलेल्या तहसीलदाराच्या नावाचा सुसाइड नोटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. साहेबराव याने आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत साडीच्या साह्याने गळफास घेतला. या प्रकरणी हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांकडून सुसाइड नोटमध्ये उल्लेख असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच जोपर्यंत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचे मृताचे वडील देशटवाड यांनी सांगितले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.