जमावबंदीचे आदेश असले तरी तुम्हाला थर्टी फर्स्ट साजरा करता येणार

जमावबंदीचे आदेश लागू मात्र संचारबंदीचे नाहीत, असे पोलिसांनी केले स्पष्ट

0

मुंबई : मुंबईत उद्या नववर्ष स्वागतासाठी रात्री समुद्र किनारे, चौपाट्यांवर फिरण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबईत ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

मुंबईत ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र हे जमावबंदीचे आदेश आहेत, संचारबंदीचे नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन रस्त्यांवरून फिरायचे नसून गर्दीदेखील करायची नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. चारचाकी वाहनातही चार किंवा त्याहून अधिक प्रवासी नसावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. भारतात ही विविध राज्यांमध्ये काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये वर्षाच्या अखेरीस लोकांनी गर्दी करू नये म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. -मुंबईसह सर्व प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान सकाळी 11 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू आहे. सर्व अनावश्यक दुकाने आणि सेवा बंद राहतील. महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 10 नंतर कोणतेही कार्यक्रम सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलमनुसार सातारा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. जिल्हयातील हॉटेल व्यावसायिकांना देखील रात्री 11 पर्यंतच हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.