तुमच्याकडेही असतील काही जुनी नाणी तर लखपती होण्याची सुवर्ण संधी 

जुनं ते सोनं’ 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची ऑनलाईन विक्री सुरू

0

नवी दिल्ली : ‘जुनं ते सोनं’ ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा भारतात नोटबंदी करण्यात आली तेव्हा मात्र सगळ्या जुन्या नोटा रोजच्या व्यवहारातून बाद करण्यात आल्या. यावेळी 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. पण आता सध्या नाण्यांची किंमत चांगलीच वाढली आहे. जर तुमच्याकडेही काही जुनी नाणी असतील तर  लखपती होण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कारण 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. इंडियामार्टच्या वेबसाईवर या नाण्यांना लोक 5 ते 10 लाखांच्या किंमतीवर विकत घेत आहेत. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर या वेबसाईवरून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पण या नाण्यांची नेमकी कशी विक्री करायची, जाणून घेऊ.

कोरोना व्हायरसचा जेव्हापासून जगात  फैलाव झाला तेव्हापासून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना अजूनही पगार मिळाले नाहीत. अशात बक्कळ पैसे कमवण्याची ही चांगली संधी आहे. खरेतर, लाख रुपये कमवण्यासाठी बराच वेळ लागतो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा मार्ग सांगणार आहोत. सध्या बाजारात 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची मागणी वाढत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही ती नाणी आहेत, ज्यांच्यावर वैष्णव देवीचा फोटो छापण्यात आला आहे. या नाण्यांना 2002 मध्ये छापण्यात आले होते.  देवीचे फोटो हे 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांवर छापण्यात आले आहेत. देवीचा फोटो असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे. या नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक तब्बल 10 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. खरंतर, हल्ली अशी नाणी मिळत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात. देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नाण्यांची किंमत वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत. जगभरात अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहे. इंडियामार्टवर अनेक लोक अशा जुन्या वस्तूंच्या शोधात येत असतात. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची संधी घालवू नका.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.