लासूरस्टेशन येथील ‘येवलेकर फर्निचर ऍण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ दुकान फोडले

शिल्लेगाव  पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल , चोरट्यास अटक

0

लासूर स्टेशन  : लासूर स्टेशन येथrल येवलेकर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी काउंटरमधील रोख रक्कम 1 लाख 90 हजार190 रुपये चोरून नेले.  शिल्लेगाव  पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता,

लासूर स्टेशन येथrल येवलेकर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी काउंटरमधील रोख रक्कम 1 लाख 90 हजार190 रुपये चोरून नेले.  शिल्लेगाव  पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलिसांनी तपासादरम्यान तक्रारदार यांच्या दुकानातील कामगार यांना विचारपूस करण्यात आली, त्यापैकी 3 जानेवारीला सर्वात शेवटी दुकानातून जाणारा कामगार गणेश कचरू बागुल (वय 20)  रा. दायगाव ता गंगापूर यास चौकशी करण्यात आली असता, त्याने  उडवाउडवीची उत्तरे दिली,  सदर संशयितास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने दुकानातील पैसे चोरी केल्याचे कबूली दिली.  त्यावरून गणेश बागुल रा.दायगाव यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली . चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गणेश कचरू बागुल  याने चोरी केल्याची कबुली दिल्यावरून शिल्लेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून सदर  चोरीस गेलेला मुद्देमाल 1 लाख 90 हजार190/- रुपये रोख रक्कम  त्याच्या ताब्यातून हस्तगत करून जप्त केली आहे.   ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोलिस अंमलदार दादाराव तिडके,विठ्ठल जाधव, आनंद अरसुडे, सचिन चव्हाण यांनी केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.