कामगारांचा देशव्यापी संप, वाळूज महानगरात बंदला संमिश्र प्रतिसाद

0
औरंगाबाद : केंद्र आणि राज्य सरकारच्या जाचक धोरण तसेच कामगारविरोधी कायद्यातील प्रस्तावित बदलाच्या विरोधात देशभरातील १० मध्यवर्ती कामगार संघटनांसह अखिल भारतीय फेडरेशनच्या ५२ शाखांच्या वतीने मंगळवार आणि बुधवार दिवशीय भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वाळूज औद्योगिक क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
कामगारांची होणारी पिळवणूक आणि कारखानदारांचे हित जोपासणाऱ्या मोदी सरकारला चलेजावचा इशारा देत केंद्रीय आणि राज्य कामगार-कर्मचारी संघटनांनी देशभरातील १० मध्यवर्ती कामगार संघटना आणि अखिल भारतीय फेडरेशनच्या ५२ शाखेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन ८ आणि ९ जानेवारी या दोन दिवसीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये सेंटर ट्रेंड ऑफ युनियन (सिटू), औरंगाबाद मजदूर युनियन, मराठवाडा कामगार विकास संघटना, न्यू पँथर कामगार सेना, पँथर पॉवर कामगार संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
मालकधार्जिणे चार लेबर कोड बनविण्याचे षडयंत्र थांबवा, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्राचे खासगीकरण बंद करा, निच्छित कालावधी रोजगार सुरु करण्याचे मालकधार्जिणे धोरण रद्द करा, असंघटित कामगारांसाठी उचित वेतन, सामाजिक सुरक्षतेचा लाभ द्या, किमान २० हजार वेतन द्या, महागाई भत्ता लागू करा, बंद केलेली जुनी पेन्शन योजना चालू करा, ईपीएस पेन्शन धारकांना कोसियारी समितीच्या शिफारशीप्रमाणे किमान ३ हजार रुपये पेन्शन द्या, महागाईनुसार वाढ द्या, घरकाम आणि घरेलू कामगार संबधीचे आयायलो कन्वेषण १७७,१८९ प्रारित करा आदी विविध मागण्यासाठी या दोन दिवशीय बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.