सहा कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या डिजीटल स्टुडिओचे काम अंतिम टप्प्यात
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘डिजीटल स्टुडिओ‘स कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी भेट देऊन केली पाहणी
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे सहा कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या डिजीटल स्टुडिओ काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या वैभवात भर घालणाऱ्या या स्टुडिओचे कॉर्पोरेट पध्दतीने व्यवस्थापन करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
‘डिजीटल स्टुडिओ‘च्या मा.कुलगुरुंसह अधिकाऱ्यांनी नुकतीचे भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्र.कुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कार्यकारी अभियंता रवींद काळे, विभागप्रमुख डॉ.दिनकर माने, उपअभियंता रमेश क्षीरसागर, संजय हुसे, जितेंद्र पाटील, जय देशमाने आदींची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी डिजीटल स्टुडिओचे डिझाईन, नकाशा व प्रत्यक्ष जागा पाहणी करुन वृत्तपत्रविद्या विभाग या ठिकाणी स्थालांतरित करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी कॉर्पोरेट व प्रोपेâशनल पध्दतीने काम करण्याचीही ते म्हणाले. दरम्यान, डिजीटल स्टुडिओचे काम अंतिम टप्प्यात असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच हस्तांतर करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता रविंद्र काळे यांनी दिली. मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत तसेच विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २ कोटींचा निधी यंत्रसामुग्रीसाठी मंजूर करण्यात आला व तो निधीही प्राप्त झाला. स्टुडिओसाठी २९ मार्च २००७ रोजी ३ कोटी ३६ लाख निधी राज्यशासनाने मंजूर केले. नंतर चार वर्षापुर्वी ८ कोटी ४० लाखांचा सुधारित निधी प्रलंबित आहे. तत्कालीन विभागप्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून सदर प्रस्ताव मंजूर करुन घेतला होता. विद्यापीठाने सुमारे सहा कोटींचा स्वनिधी खर्चुन बांधकाम पूर्ण केले आहे. लवकरच पत्रकारितेच्या विद्याथ्र्यांसाठी अद्ययावत स्टुडिओ उपलब्ध होणार आहे. या स्टुडिओला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देणाचा प्रस्ताव यापुर्वीच अधिसभेत मंजूर करण्यात आलेला आहे.