पहिल्या तासाभरातच तेजस्वी यादवांचा करिष्मा, राष्ट्रीय जनता दलाची मुसंडी

बहुमताचा आकडा गाठला हे सुरुवातीचे कल, अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष

0

पाटणा : देशभरातील जनतेचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने पहिल्या तासाभरातच बहुमताचा आकडा गाठला. हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. बिहारमधील विधानसभा निकालाच्या 2020) मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. पहिल्या तासाभरात मतमोजणीच्या सुरुवातीपासून महागठबंधनची घोडदौड पाहायला मिळाली. यावेळी भाजप आणि राष्ट्रीय जनता दल मध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. यात 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला 243 जागांसाठी मतदान झाले.

पहिल्या तासाभरात तेजस्वी यादवांची मुसंडी

बिहारच्या निकालात पहिल्या तासाभरात तेजस्वी यादव यांचाच जलवा पाहायला मिळाला. पहिल्या तासाभरात महागठबंधनने बहुमताचा आकडा गाठला, महागठबंधन 123, तर एनडीए 111 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 65 जागांसह बिहारमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या वाटेवर आहे. हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हे कल असल्यामुळे यामध्ये बदल होणे साहजिक आहे. एक्झिट पोलमधील राजकीय तज्ज्ञांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरल्यास तेजस्वी यादव हे बिहारचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून समोर येतील. यापूर्वी वयाच्या 32व्या वर्षी देशातील कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री झालेला नाही. मतपेटीत अनेक उमेदवारांचे भवितव्य कैद झालेले असून, मंगळवारी होत असलेल्या मतमोजणीमुळे अनेक मंत्र्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

नितीश कुमारांचा शेवट गोड होणार का?

“आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला”, अशा शब्दात राजकीय संन्यासाचे संकेत देणाऱ्या नितीश कुमार यांचा शेवट गोड होणार? की तेजस्वी यादव यांच्या माध्यमातून बिहारला सर्वात तरुण मुख्यमंत्री मिळणार हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. अशावेळी बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.