राष्ट्रवादीची एकनाथ खडसेंच्या पुढाकाराने ‘महाभरती’ जोमाने

चाळीसगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले घड्याळ

0

जळगाव : एकनाथ खडसे  यांच्या पुढाकाराने जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या ‘महाभरती’ला मिळणारा प्रतिसाद उत्तरोत्तर वाढतच आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेरमधील भाजप कार्यकर्त्यांची फौजेला गळती लावली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा चाळीसगाव मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होताना दिसले.

‘जिकडे खडसे’ तिकडे आम्ही’, असा नारा देत भाजपच्या या कार्यकर्त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जवळपास 100 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षा रोहिणी खडसे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील निवृत्ती पाटील हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या जाण्याने आम्हाला फरक पडणार नाही किंवा आमच्याकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरुन काढणारे सक्षम नेते आहेत, हे भाजप नेत्यांचे दावे केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. मात्र, गिरीश महाजन हे अजूनही ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीत. जामनेरमधील भाजप कार्यकत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले होते. जामनेरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये एकही जण भाजपचा सदस्य नव्हता. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनाच राष्ट्रवादीत घेतले, ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचे भासवले गेल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. तर एकनाथ खडसे यांनीही जामनेरमधील भाजप कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर भाजपला इशारा दिला होता. आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.