नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत

अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत दिली माहिती

0

अहमदनगर : “राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार आहे,” असेही राजेश टोपे म्हणाले. अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.

“ सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत  पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल,” अशी अपेक्षा करूया, असे राजेश टोपे म्हणाले.“कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे,” असेही राजेश टोपे यानी स्पष्ट केले. “तसेच आरटी पीसीआर टेस्टची किंमत 800 रुपयांपर्यंत आणली आहे. याची किंमत केंद्र सरकारने साडे चार हजार रुपये ठरवली होती. मात्र आम्ही दोन टप्प्यांत ती खाली आणली आहे. तसेच येत्या आठवड्यात तो आठशे रुपयांपर्यंत आणणारा, असा सूतोवाच राजेश टोपे यांनी केला. त्याशिवाय मास्कच्या किंमतीदेखील खाली आणल्याचे टोपे यांनी सांगितले.” आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रिपब्लिकन न्यूज चॅनलचा टीआरपी प्रकरण, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशासह इतर गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली. “रिपब्लिकन न्यूज चॅनलच्या टीआरपी संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. कायद्याच्या अनुषंगाने धूळ फेकण्याचे काम काही चॅनल्सने केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. तसेच विनाकारण यंत्रणेला पोलिस खात्याला बदनाम करण्याचे काम कोणी करत असेल तर दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे,” असे स्पष्ट मत टोपेंनी मांडले. “महाराष्ट्र सरकार हे लोकशाही आघाडीचे सरकार आहे. सरकार कोरोना काळात अत्यंत पारदर्शक आणि जेवढ्या जमेल तेवढ्या कार्यक्षमतेने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्याकडून लक्ष विचलित करण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत असतील तर ते चुकीचे आहे,” असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशासंदर्भात टोपे यांनी भाष्य केले आहे. “जर योग्य लोक असतील तर राष्ट्रवादी नेहमीच त्यांचे स्वागत करतो. तसेच पक्ष कर्तृत्ववान माणसाला स्वीकारतच असतो. प्रत्येक पक्षात लोक कर्तृत्ववान असतात. जर कोणी येऊ इच्छित असेल तर राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना वाट करून दिली पाहिजे,” असा सल्ला राजेश टोपे यांनी दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.