पश्चिम मतदारसंघातून उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्य देणार : संजय शिरसाट
आमदार संजय शिरसाट यांनी पदवीधर मतदारांच्या घेतल्या भेटी आणि सहविचार सभा
औरंगाबाद : महाविकास आघाडी पदवीधरचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आमदार संजय शिरसाट यांनी अरिहंत नगर, न्यू शांतिनिकेतन कॉलनी, नाथपुरम वीटखेडा, वृंदावन कॉलनी सातारा येथे पदवीधर मतदारांच्या भेटी व सहविचार सभा घेतल्या.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हेच विद्यार्थ्यांचे, बेरोजगार तरुण पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी आग्रही असतात आणि तेच योग्य आणि अनुभवी उमेदार असून यावेळीदेखील हट्ट्रिक करतील, यात मात्र शंका नाही. तरी सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यासाठी गाफील न राहता जोमाने कामाला लागावे व प्रत्येक मतदाराचे मतदान करून घ्यावे. पश्चिम मतदार संघातून उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार, अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी अरिहंत नगर, न्यू शांतिनिकेतन कॉलनी, नक्षत्रवाडी येथील सहविचार सभेत दिली.आयोजित कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यातील बेरोजगारीचे मागासलेपण बाजूला सारून तरुणांना आगामी काळात रोजगार उपलब्ध करून देण्यास माझा प्रयत्न असेल. कायद्याची प्रतिष्ठा जपणारी नॅशनल लॉ कॉलेज ची इन्स्टिट्यूट शंभर जागेवर औरंगाबादेत साकारत आहे. यासाठी मी गेल्या सहा वर्षांपासून शासनाला पाठपुरावा करत होतो. मराठवाड्यातील बहुजनांच्या विद्यार्थ्यांचे भविष्य या लॉ इन्स्टिट्यूट मुळे उज्वल होणार आहे. त्याचे समाधान मला वाटते. त्यामुळे आगामी काळात पदवीधरांच्या आणि तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी मला प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी एक डिसेंबर रोजी मतदान करावे. अशी विनंती महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी केली. यावेळी आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उमेदवार सतीश चव्हाण, महापौर नंदकुमार घोडेले, सहसंपर्कप्रमुख त्रिबक तुपे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, उपशहरप्रमुख बापू पवार, सतीश निकम, वसंत शर्मा, सुरेश गायके, शाखाप्रमुख माणिक जोहरले, सोमनाथ देव्हरे, गोरख सोनवणे, संजय खडके, अनिल थोटे, कुणाल त्रिभुवन, आनंद हिवराळे, धनंजय भार्गव, राजू महाशब्दे, कैलास काथर, अरुण मरावर, शंकर बिराजदार, राजू मंडलिक, मुन्ना मुदलीवर, राजू राजपूत, मुकुंद विभूते, बाळासाहेब देवकाते, गणेश मोगल, नितीन गँगवाल, चंदू पाटणी, स्वप्नील काथार, प्रेम पांढुरकर आदींची उपस्थिती होती.