चिराग ठरणार का किंगमेकर ? मतमोजणीचा ट्रेंड बदलला, भाजपची मुसंडी

मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित 'एनडीए'ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊ आता काही तास उलटले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित ‘एनडीए’ने जोरदार कमबॅकचे चित्र आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित ‘एनडीए’ने जोरदार कमबॅकचे चित्र आहे. त्यामुळे एनडीएच्या आघाडी असलेल्या जागांची संख्या जवळपास 100 पर्यंत पोहोचली. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीएच्या संख्याबळात फारसा फरक उरलेला नाही. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती कायम राहिल्यास अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापन करण्याची संधी एनडीएला मिळू शकते.
अशावेळी लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी बहुतांश एक्झिट पोल्सनी बिहारमध्ये महागठबंधनची एकहाती सत्ता येईल, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. त्यामुळे राजदच्या कार्यकर्त्यांकडून कालपासूनच सेलिब्रेशनला सुरुवात झाली होती. मात्र, आता मतमजोणीच्या काही तासानंतर महागठबंधन एकहाती जिंकणार नाही, याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण होऊ शकते. तशी वेळ आल्यास भाजपचे ‘चाणक्य’ नेते अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना गळाला लावून महागठबंधनचे सत्ता स्थापनेचे स्वप्न धुळीस मिळवू शकतात.बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल अर्थात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने पहिल्या तासाभरातच बहुमताचा आकडा गाठला. हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दोन तासांच्या मतमोजणीनंतर महागठबंधन 112, तर एनडीए 105 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 62 जागा मिळवत बिहारमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या वाटेवर आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.