वन्यप्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्याने वाचवले काळवीटाचे प्राण

शेतकरी वाबळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराची दिली माहिती

0

हिंगोली  : हिंगोली जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. एकीकडे प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी लढा  देत  आहे.   याचा गैरफायदा घेऊन वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी दिवसाढवळ्या शिवारात फिरत आहेत. शिकारी टोळक्याच्या तावडीतून एका शेतकऱ्याने असह्य काळविटाचा प्राण वाचवला.

हिंगोली तालुक्यातील बोराळवाडी शिवारात आज सकाळी   शिकारी टोळक्याच्या तावडीतून शेतकऱ्याने असह्य काळविटाचा प्राण वाचवला. शिकारीचे सर्व साहित्य सोबत असलेल्या या टोळक्याने या काळवीटाला पकडून ठेवले होते. परंतु ऐन वेळी उमरा वाबळे येथील शेतकरी माधव वाबळे हे शेतामध्ये गेले असता, हा प्रकार त्यांच्या लक्षात  आला. त्यांनी त्वरित या सर्व प्रकाराचे चित्रीकरण केले आणि त्या शिकाऱ्यांना त्या काळवीटास सोडण्यास भाग पाडले. शेतकरी वाबळे यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि लगेचच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. मागील वर्षीदेखील पावसाळ्यात याच परिसरात हरिणाची शिकार एका टोळीने केली होती. वन विभागाच्या पथकाने तेव्हा घटनास्थळी धाव घेतली होती, मात्र शिकारी पळून गेले होते. आतादेखील शेतकऱ्याने या विषयी माहिती दिल्यानंतर वन विभागाचे एक पथक या भागात रवाना झाले आहे. अशी माहिती हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांनी दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.