पत्नीचा विष प्राशल्याने मृत्यू, पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या

परळीजवळील पांगरी कॅम्प येथील घटना, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद

0

बीड : परळी येथील पांगरी कॅम्प येथे ही घटना घडली. प्रियंकाने मंगळवारी घरातच कीटकनाशक प्राशन केले. . रात्री साडेनऊ वाजता तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीनेही मामाच्या घरी रात्री ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.  दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत.

 परळी येथील पांगरी कॅम्प येथील जेसीबी ऑपरेटर सायस विलास पंडित (२४) याचे ९ जून २०२० ला तळेगाव येथील प्रियंकाशी लग्न झाले होते. मात्र दोनच महिन्यांत त्यांच्यात कुरबुरी होऊ लागल्या होत्या. प्रियंकाने मंगळवारी घरातच कीटकनाशक प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने नातलगांनी प्रियंकाला रात्री ८ वाजता परळीच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु रात्री ९.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी प्रियंकाचा मृतदेह तळेगावात आणला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच सायसने पांगरीला शेजारी राहत असलेले मामा रावसाहेब गोविंद पाचांगे यांच्या घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली. प्रियंका व सायस यांच्या मृतदेहांचे बुधवारी परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. प्रियंकाच्या मृत्यूबद्दल नातलग सासरच्या लोकांविरुद्ध रोष व्यक्त करत होते. याबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.