भुमरे साहेबांचा शिवसेना नगरसेवकांवर भरोसा नाय का…?         

नगरविकास खात्याचा निधी नगरपरिषदेला वगळून बांधकाम विभागाला वर्ग

0

पैठण : नामदार भुमरे यांनी शहराच्या विकासासाठी कोरोनाच्या संकट काळातही 12 कोटी 35 लाख इतका निधी नगरविकास खात्यामार्फत ठोक तरतूद 9 कोटी 35 लाख रुपये व वैशिष्टपूर्ण कामासाठी 3 कोटी इतका निधी मंजूर केला. तो  नगरविकास खात्याचा निधी असताना, सर्व विकासकामे पैठण शहराच्या हद्दीतील  व नगरपालिकेसारखी मोठी यंत्रणा पैठण शहरात असतांना, तो निधी बांधकाम विभागाला वर्ग केल्याने पैठण नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे 8 नगरसेवक असताना संबंधित निधी नगरपालिकेला वर्ग न केल्यानें नामदार भुमरे यांचा त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नसल्याची चर्चा पैठण शहरात होताना दिसत आहे.

नगर परिषदेकडे आज सक्षम यंत्रणा आहे. याच यंत्रणेने पैठण शहरात अनेक विकास कामे केली आहेत, आज रोजी नगर परिषदेकडे 4 ते 5 अभियंते आहेत त्यात स्थापत्य अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, इलेक्ट्रिक अभियंता असे तांत्रिक अभियंते असताना नगरपालिकाही हा निधी वापरण्यासाठी सक्षम आहे तरीही नगरविकास खात्याचा निधी बांधकाम विभागाला वर्ग केल्याने नगरसेवक नाराज असल्याचे चित्र पैठण शहरात पाहावयास मिळत आहेत, नामदार भुमरे यांनी आपल्याच पक्षातील शिवसेनेचे 8 नगरसेवकावर अविश्वास दाखवल्याची चर्चेला पैठण शहरात उधाण आले आहे.

पैठण शहर हद्दीतील विकासकामे… 

पैठण शहर हद्दीतील विकासकामे  करण्याची ठिकाणे  व लागणारा निधी : स्वामी समर्थ मंदिर बांधकाम व सुशोभिकरण 70 लाख, शादीखाना नेहरू चौक 70 लाख, पन्नालाल नगर सामाजिक सभागृह 15 लाख,  छत्रपती कॉलनी सुशोभिकरण व बांधकाम 50 लाख, दत्त मंदिर डोम 15 लाख, डॉ.आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरण 40 लाख, भावसार समाज सभागृह 10 लाख,  कब्रस्तान 25 लाख, शहरातील विविध रस्ते व विकास कामे सर्व मिळून 12 कोटी 35 लाख नगरविकास खात्याअंतर्गत निधी मंजूर झाला. वरील सर्व कामे पैठण शहर हद्दीतील आहेत,  नगर परिषद सक्षम असताना तरीही निधी बांधकाम विभागाला वर्ग केला म्हणून शिवसेना नगरसेवक व काही कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा शहरात होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.