महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे? हाच मोठा प्रश्न – प्रकाश आंबेडकर

सरकार उद्धव ठाकरे चालवत आहे की अजित पवार

0

मुंबई : भाजपच्या काळातच मोठ्या प्रमाणात वीजबिलांची थकबाकी झाली आहे, अशी टीका आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.भाजप वीजबिलाच्या मुद्द्यावरून सर्वत्र आंदोलने करीत आहे. परंतु त्यांना आंदोलन करण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही.

महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? हा मोठा प्रश्न आहे. कारण लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिलात सवलत देऊ, असे राज्य सरकारच्या वतीने सांगितले होते. त्याबाबतचा प्रस्तावदेखील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. परंतु तो प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी दाबून ठेवला आहे. हा प्रस्ताव दाबण्याचा अधिकार अजित पवार यांना कोणी दिला असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. जर अशी बाब समोर येत असेल तर मग राज्य नेमके कोण चालवते  आहे? महाराष्ट्र राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण आहे? उद्धव ठाकरे की अजित पवार ,असा सवाल देखील आंबेडकरांनी केला. त्यामुळे आता सरकारने वीजबिलात सुट द्यावी. अन्यथा आमचे सर्वसामान्य नागरिकांना आवाहन आहे की, वीजबिल भरू नये. वीज मंडळाने पुरवठा खंडित केल्यास आम्ही ग्राहकांच्या वीज जोडण्या पूर्ववत करू, असे आंबेडकर म्हणाले.  प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे विरोधकांच्या अजेंड्यावर चालणारे सरकार आहे. सध्या उद्धव ठाकरे सरकार चालवत आहे की अजित पवार असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः काही बाबतीत निर्णय घेण्याची गरज आहे. तसे होताना दिसत नाही. सध्या विरोधक मागणी करतात. मग त्या मागणीचा पाठपुरावा सरकार करते. महावितरण कंपनीने कोरोना संकटात जनतेला वीजबिलात ५० टक्के सुट देण्यास तत्वतः मान्यता दिली होती. त्या संदर्भातील एक फाईल आणि त्यावरील शेरा हा विचारात घेण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वीजबिलासंदर्भात मोठा दिलासा द्यावा. पण, या संदर्भातील ती फाईल राज्याचे अर्थमंत्री यांनी दाबल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.