व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

अभिनेत्रींना शिक्षा होईल की नाही, असे आता सांगता येणार नाही, हा तपासाचा भाग

0

जळगाव : व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या माध्यमातून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बड्या अभिनेत्रींना समन्स बजावले आहे. याविषयी भाष्य करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही’ असे मत व्यक्त केले.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांसारख्या बड्या अभिनेत्रींना ‘एनसीबी’कडून समन्स बजावला आहे. त्यांचे चॅटिंग किंवा मेसेज ”एनसीबी’च्या हाती लागले आहेत. त्या आधारे या अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणात अडकू शकतात का? हा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जाऊ शकेल का? असे प्रश्न विचारले जात आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग किंवा मेसेजस हा उत्तम पुरावा होऊ शकत नाही. यासाठी ‘एनसीबी’ला आणखी पुरावे शोधावे लागतील. परंतु अनेक ड्रग्ज पुरवणाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असल्याचे समोर आले असल्याने व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि मेसेज हे महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात.’ ‘या अभिनेत्रींना ‘एनसीबी’ने समन्स बजावला आहे. कारण या प्रकरणाबाबत त्यांना अधिक पुरावे जमा करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता येईल. आणखी तपास सुरू असल्यामुळे त्यांना शिक्षा होईल की नाही, असे  आता सांगता येणार नाही. हा तपासाचा भाग असल्याचे यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.