कोण अब्दुल सत्तार, यांना कोकणाची काय माहिती? नारायण राणेंचा सवाल

राणे यांची पत्रकार परिषदेत अब्दुल सत्तार यांच्या कोकण दौऱ्यावर टीका

0

सिंधुदुर्ग : “महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोण आहेत? त्यांना कोकणाबाबत काय माहिती आहे? महसूल राज्यमंत्र्याला काय अधिकार आहेत?”, असे सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केले . राणे यांनी सिंधुदुर्गात आज (3 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली.

महसूल राज्यमंत्री अअब्दुल सत्तार गेल्या आठवड्यात दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सत्तार यांच्या याच दौऱ्यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे. याशिवाय नारायण राणे यांनी शिवसेनेवरदेखील सडकून टीका केली. “राज्याचा महसूलमंत्री काँग्रेसचा आणि राज्यमंत्री शिवसेनेचा, कोण विचारतंय? काहीही बोलतो. सत्तारांना मी गेल्या चाळीस वर्षांपासून ओळखतोय. ते अगोदर अशोक चव्हाण यांच्याबरोबर फिरायचे”, असा टोला भाजप नेते नारायण राणे यांनी लगावला. “शिनसेनेचे 145 आमदार निवडून आले म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यांना लोक तुमचे किती आमदार निवडून आले? असा प्रश्न विचारतील. त्यामुळे उद्धव ठाकरे पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत”, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.“शिवसेनेचे फक्त 56 आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी कोकणातील अकराही आमदार घरी बसवणार आहोत. कोकणातून शिवसेनेला हद्दपार केले जाईल”, असे नारायण राणे म्हणाले. “कोकणातील 11 आमदार विधानसभेत कोकणातील विकासासंदर्भात बोलतात का? जाहीर केलेला फंडही सरकार देत नाहीत. त्यामुळे आमदार काहीही करू शकत नाही. पालकमंत्री तर निष्क्रीय आहे. काही कामाचे नाहीत. ते जिल्ह्यात येऊन काय करतात हे एक दिवस सांगेन. शिवसेनेचे आमदार विधानसभेत नाही बोलले तरी कोकणाचा विकास थांबवायचा नाही हे आम्ही ठरवले आहे. कोकणातील विकासाला चालना मिळालीच पाहिजे. त्यासाठी भाजप आंदोलन करेल”, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.