बिहार निवडणुकीत आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांचा दावा

एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली

0

अकोला : बिहारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवारी पार पडले. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अशातच बिहार निवडणुकीमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

“आमच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्सने विकासाला केंद्रबिंदू मानून प्रचारात वास्तव मुद्द्यांवर भर दिला. आमच्यामुळेच बिहारची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आली, असे सांगताना बिहारमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. बिहार विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल”, असे भाकितही प्रकाश आंबेडकर यांनी  वर्तवले. “बिहार निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण दाखवले, पण मोदींच्या सभेची गर्दीच दाखवली नाही. कारण शब्दांनी लोकांचे पोट भरत नाही. लोकं हाताला काम मागतात हे आता भाजपला आता कळाले आहे. समाजातील राजकीय आणि वैचारिक घुसळणीला बिहारच्या निवडणुकीने सुरुवात झाली आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. “बिहार निवडणुकीमध्ये कोणालाही बहुमत मिळेल, अशी परिस्थिती नाही. निवडणुकीअगोदर एकीबरोबर लग्न कारायचे आणि निवडणुकीनंतर मैत्रिणीबरोबर पळून जायचे असे बिहारमध्ये होईल”, अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रात जसे घडले तसे बिहारमध्येही घडेल का? पत्रकारांच्या या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘तिथे काय होईल मी सांगितले, मी कम्पेअर करणार नाही’. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना खोचक सवाल विचारला आहे. राज्यात आता जवळपास सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण मंदिरे अद्याप सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यावरुन भाजपची आध्यात्मिक आघाडीही जोरदार आंदोलन करत आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनीही मंदिराच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.