अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही, पूजाच्या आईचा धक्कादायक खुलासा

ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही, असे मंडूबाई चव्हाण म्हणाल्यात.

0

बीड  : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता पूजाची आई आणि बहिणीने मोठे गौप्यस्फोट केले. आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असेही पूजाची आई मंडूबाई चव्हाण म्हणाल्या आहेत.
पूजाच्या आई आणि बहिणीने धक्कादायक माहिती सर्वांसमोर आणली. माझ्या मुलीचा मृत्यू झाला, तिची बदनामी करू नये, माझी मुलगी कशी होती मला माहीत आहे. ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही, असेही मंडूबाई चव्हाण म्हणाल्यात.

अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा खुलासा

मला आणखी पाच मुली आहेत, आम्ही सगळेच आत्महत्या करणार आहोत. पूजाने आम्हाला काहीच सांगितले नाही. दोन ते चार दिवसांत येते आणि भेटून जाते, असे तिने सांगितले. बाकी काहीच बोलली नाही, असा खुलासाही पूजाच्या आईने केला. अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही. फक्त नावच ऐकले आहे. ती आमच्यासाठी मुलासारखीच होती. सर्व तिला राखी बांधत होते. सर्वांची काळजी घ्या, असे ती नेहमी सांगायची. आम्हाला काहीच माहीत नाही, उगाच काही तरी बदनामी करायची, त्यांना काही मुलीबाळी नाहीत काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, पूजाची आई उद्विग्न

आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असेही पूजाची आई म्हणाली. माझी मुलगी धाडसी होती. तिची हत्या आहे की आत्महत्या, याबद्दल काहीच सांगता येत नाही, असे म्हणत मंडूबाईंनी बोलण्यास नकार दिला. अरुणला फक्त एकदा पूजासोबत पाहिले होते. माझी बहीण वाघिण होती, ती आत्महत्या करणाऱ्यांपैकी नाही. ती प्रीतम मुंडे आणि पंकजाताई मुंडेंसोबतही फिरलेली आहे. माझी बहीण कार्यकर्ती होती हे अख्ख्या बीडला माहीत आहे, तिचे कोणासोबत नाव जोडणे योग्य नाही, असेही पूजा चव्हाणची बहीण म्हणाली आहे.

दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडचे नाव आले आहे. हा अरुण राठोड बीडचा असून वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर यवतमाळमधील अरुण राठोड याचा पत्ता शिवाजी नगर, नांदेड, असा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणांतील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत? असा सवाल निर्माण झाला आहे.

‘त्या’ व्हायरल क्लिपमध्ये काय संभाषण झाले होते?

पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर एकूण 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात अरुण चव्हाण आणि कथित मंत्र्याचे कथित संभाषण होते. त्यात पूजाच्या उपचाराबाबत दोघांनीही चर्चा केली होती. ट्रिटमेंट घेतल्यानंतर आत्महत्या करणार असल्याचे पूजाने या अरुणला सांगितले होते. तसेच पूजाने एक किट आणून काही तपासणी केली होती. ती किट पॉझिटिव्ह आल्यानंतर अरुण घाबरला होता. त्यामुळे पूजावर नेमका कोणता उपचार सुरू होता? अरुण का घाबरला होता? असा सवालही केला जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.