आम्ही मराठा समाजासोबत, मात्र ओबीसीमधून त्यांना आरक्षण नको : प्रकाश शेंडगे

दोन्ही समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न"

0

मुंबई : “जे मराठा समाजाला दिलं जात आहे, तसेच लाभ ओबीसी समाजालाही दिले पाहिजेत. मात्र ओबीसीमधून त्यांना आरक्षण नको,” अशी भूमिका माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करणार आहे.  ओबीसी समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

“त्या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन करणार आहे. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात येणार असून त्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर पुढच्या टप्पातील आंदोलन हे तहसीलदार कार्यालय समोर केले जाईल, ज्याची तारीखनंतर जाहीर केली जाईल,” असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले. तसेच मराठा समाजाला जे लाभ दिले जात आहे, ते आणि तसेच लाभ ओबीसी समाजालाही दिले पाहिजेत, त्याशिवाय राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेली मेगाभरती थांबवली पाहिजे, अशीही आमची मागणी आहे. आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत. ओबीसीला वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमी करत आहे, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले. दरम्यान, सर्वांचे आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण देण्याची मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उद्विग्न भावनेतून केली असावी, असे मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले होतं. राज्यातील मागासवर्गीय समाज व बारा बलुतेदारांचा जीवनासाठी संघर्ष अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करून चालणार नाही, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.