उद्धव ठाकरेंसाठी सावधानतेचा इशारा, ‘हिंदू’ शब्दाआडून मोठे अभियान
ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच मारली फुली, सरकारला हिंदू शब्दाचे वावडे, असा आरोप
मुंबई : दहावी आणि बारावी परीक्षा फॉर्मंमध्ये हिंदू शब्द वगळल्याने भाजप नेते आक्रमक झाले होते. ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच फुली मारली. सरकारला हिंदू शब्दाचे वावडे आहे, असा आरोप मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केला होता. त्याला मराठीसह हिंदी प्रसार माध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. या परीक्षा फॉर्ममध्ये धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ शब्द वगळ्यात आला आहे. त्याऐवजी अल्पसंख्यकेतर (नॉन मायनॉरिटी), असा उल्लेख केल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला होता. हाच मुद्दयाला घेऊन देशातील मोठ्या वृत्तवाहिन्यांववर भारतीय जनता पक्षाने ठाकरे सरकारला घेरल्याचे दिसत आहे. दहावी आणि बारावी परीक्षा फॉर्म मागे घ्यावेत. तसेच सरकारने या फॉर्ममध्ये हिंदू धर्माचा उल्लेख करावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. तसेच, ठाकरे सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर भाजप या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारादेखील भाजपने ठाकरे सरकारला दिला आहे. मात्र आता शिवसेनेने सावध राहण्याची वेळ आली आहे. कारण स्वत:च्या चुका उद्धव ठाकरेंच्या माथी मारून ‘हिंदू विरोधी शिवसेना’ अभियान राबवत असावे. अतुल भातखळकरांच्या त्या आरोपावर एक अहवाल दिला होता. महाराष्ट्र शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये हिंदू पर्याय काढून टाकला आहे. राज्य सरकारने पुढील मंडळाच्या परीक्षांसाठी नव्याने जाहीर केलेल्या परीक्षा फॉर्ममध्ये हिंदू ऐवजी अल्पसंख्याक हा शब्द वापरला आहे. असा दावा केल्याचे पाहावयास मिळत आहे.