वाळूज महानगर- सम्यकवासी व सम्यक साेसायटीच्या वतीने रक्तदान शिबिर

रक्तदान शिबिराचे उद्घाटन तिसगावच्या उपसरपंच  व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्घाटन

0

औरंगाबाद : वाळूज महानगर- सम्यकवासी व सम्यक साेसायटीच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तिसगावच्या उपसरपंच  व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.
राज्यात गेल्या काही दिवसापासून काेराेना रुग्ण वाढत असल्याने काेराेनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून विविध उपाय याेजना केल्या जात आहेत. या परिस्थितीत अनेक अडचणींना ताेंड देतांना रक्ताचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. त्यामुऴे हा तूटवडा भरुन काढण्यासाठी अनेकदा रक्तदान शिबिर घेतली जातात. रक्तदान शिबिराचे उद्घाटन तिसगावचे उपसरपंच  कुठारे व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सिंह यादव, सुनील भरते, राजेंद्र कश्लिवाल यांच्या हस्ते केले वाळूज महानगरातील सम्यकवासी व सम्यक मधील तरुणांनी ही परिस्थिती लक्षात घेता, रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात सम्यकवासी व इतर मित्रमंडळाने सहभाग नोंदवला. शिबिरात सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन केले हाेते. यावेळी 51  रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या.रक्तदान शिबिरात बालाजी भराटे, अंकुर बदजाते,शैलेश बडजाते,कुशल पाटणी,आनंद चोरडिया, सचिन चांदीवाल,भुपेंद्रसिंग परिहार,संदीप इंदाने,अविनाश काठवठे,विजय सारडा,पुष्कर भंडारी,विष्णू देठे,भरत गोरे आदींनी सहकार्य केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.