विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान; हॅट्ट्रिक करणार, सतीश चव्हाणांचा विश्वास

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर प्रथमच भाजपशी थेट सामना होणार असल्याने उत्सुकता

0

 औरंगाबाद  : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान झाले. औरंगाबाद विभाग, पुणे आणि नागपूर, अशा पदवीधरच्या तीन आणि अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांसाठी हे मतदान होत आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मतदान केले तर सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजपशी थेट सामना होणार असल्याने या निवडणुकीबद्दल उत्सुकता होती.

अपडेट्स…

धुळे नंदूरबार प्राधिकारी मतदारसंघ पोटनिवडणुकीत दुपारी 2 वाजेपर्यंत 93 चक्के मतदान

जालना जिल्ह्यात दुपारी 2.00 वाजेपर्यंत 37 टक्के मतदान

परभणी जिल्ह्यात सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत 41.07 टक्के मतदान

अमरावती शिक्षक मतदारसंघात दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी 46.71 टक्के मतदान. सर्वाधिक यवतमाळात – 49.20. सर्वात कमी बुलडाणा – 45.02 टक्के.

औरंगाबाद विभागात पदवीधरसाठी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यत 20 टक्के मतदान

> औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात पहिल्या दोन तासांत 7.63 टक्के मतदान झाले.

> औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक 9.27 टक्के तर नांदेडमध्ये सर्वात कमी 5.78 टक्के मतदान, आतापर्यत 28487 लोकांनी बजावला मतदानाचा अधिकार. यावेळी आपण हॅटट्रिक करणार, असा विश्वास सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या मतदान वेळेपेक्षा जास्त 60 टक्के मतदान होणार असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला.

…..हे उमेदवार आहेत रिंगणात

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान झाले. आठही जिल्ह्यांमध्ये यंदा एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 813 मतदार केंद्रांवर निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बोराळकर नशीब आजमावणार. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक रमेश पोकळे यांनी बंडखोरी केल्याने निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पुणे येथील पदवीधर मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख, राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात लढत होती. हे दोघेही सांगलीचे आहेत. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे किती मते घेतात, यावरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा.जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यात थेट लढत आहे. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात विद्यमान महापौर भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात तर अमरावती शिक्षक मतदारसंघात प्रा.श्रीकांत देशपांडे व भाजपचे डॉ.नितीन धांडे यांच्यात प्रामुख्याने लढत झाली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.