पंढरपुरात ‘माघ वारी’निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजले फुलांनी…

विठुरायाचे आजचे गोजिरे साजिरे रुप दिसते अधिकच खुलून

0

पंढरपूर : आज माघी एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी माता मंदिराचा गाभारा फुलांनी सजवण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर बंद आहे.

आज माघी एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी माता मंदिराचा गाभारा फुलांनी सजवण्यात आला आहे.  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर बंद आहे. असे असले तरी आज माघी एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेचा गाभारा फुलांनी सजवण्यात आला आहे. यावेळी सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना झेंडू, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडू, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकिड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे विविध रंगांच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. विठुरायांचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.