‘छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेस’ जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांची भेट

संस्थेचे अध्यक्ष रणजीतभैय्या मुळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार

0

औरंगाबाद : कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेस “माझी कुटुंब, माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सदिच्छा भेट दिली.

कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेस “माझी कुटुंब, माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी संस्थेच्या रुग्णालयास  सदिच्छा भेट दिली.  त्यांनी रुग्णालयाच्या विविध विभागांस भेट देऊन रुग्णालय राबवत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली. संस्थेचा कॅम्पस फिरून संस्थेचे सचिव पद्माकर मुळे आणि व्यवस्थापनाचे विशेष कौतूक केले.  कॅम्पस परिसरातील विविध झाडे, हिरवळ आणि स्वच्छता बघून समाधान व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीतभैय्या मुळे यांनी जिल्हाधिकारी चव्हाण आणि मनपा आयुक्त पांडेय यांचा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनापटावर आधारित पुस्तक भेट देऊन सत्कार केला.
यावेळी मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. सारिका कदम, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय संचालक डॉ. सुभाष भोयर, कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, डॉ. तलक काझी, डॉ. संगीता पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.