हाथरस प्रकरण : ‘भीमशक्ती’ संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

भीमशक्ती संघटनेच्या वतीने हाथरस बलात्कारप्रकरणी संताप व्यक्त

0

औरंगाबाद : हाथरस बलात्कारप्रकरणी विरुद्ध संताप व्यक्‍त करीत भीमशक्ती संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निद्रशने व आंदोलन केले.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका 19 वर्षीय दलित तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपींना वाचविण्यासाठी बलात्कार झालाच नाही, असे दाखविण्याचा पोलिसांमार्फत प्रयत्न केला. तसेच तरुणीच्या निधनानंतर तिचे प्रेत नातेवाईकांना न देता पोलिसांनी रात्रीच्या वेळेस अंत्यसंस्कार उरकण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांवर प्रशासनाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रसिद्धीच्या माध्यमांना व राजकीय पक्षाच्या नेत्यांना रोखण्यात आले. यासर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भीमशक्‍ती चर्मकार महासंघाने आंदोलन केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हाथरस बलात्कारप्रकरणी विरुद्ध संताप व्यक्‍त करीत जोरदार निद्रशने व आंदोलन करण्यात आले. यावेळी योगी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दोषींना फाशी द्या, योगी सरकार हाय हाय आदी घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी दिनकर ओंकार, शांतीलाल गायकवाड, बाबूराव वाकेकर, पंडितभाई नवगिरे, कैलास जुमडे, राजू मंजुळे, किशोर जाधव, संतोष भिंगारे, विश्वंभर भालेराव, अमोल तुपे, प्रकाश प्रधान, प्रेम चव्हाण, सचिन घोले, राहुल पवार, विक्रम घायतिलक आदींची उपस्थिती होती.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.