हिंगोलीत पुन्हा आचारसंहितेचे उल्लंघन, राष्ट्रीयीकृत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आचारसंहितेचा भंग
औरंगाबाद : पारदर्शक व निस्पृह वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी आदर्श आचारसंहिता पाळणे सर्वांना बंधनकारक असते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचार संहिता लागू होऊन चार दिवस उलटले तरी शासकीय निमशासकीय कार्यालयां कडूनच आचार संहितेचा भंग केला जातोय.
गेल्या आठवड्यात राज्य परिवहन महामंडळाने आचार संहितेचे उल्लंघन केले होते. तर गुरुवारी हिंगोलीत असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शासकीय विश्रामगृहाजवळच्या शाखेबाहेर पंतप्रधानांचे छायाचित्र असणारे पोस्टर लावलेले आहे. या पोस्टरला काढण्याची तसदी बँक व्यवस्थापनाने घेतली दिसत नाही. एकिकडे निवडणूक आयोग सगळीकडे आचारसंहितेची शिस्त लावत आहेत तर दुसरीकडे शासकीय व निमशासकीय कार्यालये व यंत्रणांकडूनच आचार संहितेची पायमल्ली करताना दिसत आहेत.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…