औरंगाबादच्या केळगावात दंगल, विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला

आरोपीच्या घराबाहेर गावकरी जमा हल्लेखोरांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावात दंगल उफाळली आहे. विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. दीडशे ते दोनशे गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीच्या घराबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते की, हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावात दंगल उफाळली. विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला  मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस पाटील महिलेचा आरोपीने सातत्याने विनयभंग केला होता. त्यामुळे आरोपीच्या त्रासाला कंटाळवून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी पोलिस पाटील महिलेने व्हीडीओ केला होता. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. या जीवघेण्या घटनेमध्ये पीडिता थोडक्यात बचावली असून त्यांच्यावर सिल्लोडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरंतर, या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं होतं. पण त्याला जामीन मिळाल्यामुळे गावकरी संतापले होते. त्यामुळे त्यांनी थेट घरावर हल्ला करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये आरोपीच्या घराची मोडतोड करण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी पोलिस व्हॅनवरही दगडफेक केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत पाच राउंड फायर करत गोळीबार करण्यात आला. यामुळे सध्या गावाला छावणीचे स्वरूप आलं असून हल्लेखोरांची धरपकड सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.