नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे . त्यांनी ट्विटरवरून अधिकृतपणे आज (29 सप्टेंबर) याबाबत माहिती दिली. नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली आहे.
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाईन आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती नायडू यांच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले की,, “आज सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नियमित कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी उषा नायडू यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली . त्या स्वयंविलगीकरणात आहेत.” ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विट करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.