दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील रुग्णालयात दाखल

0

नवी दिल्ली : भारतीय संघाचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे.

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. कपिल देव यांच्याच नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.