भारत पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत – डोनाल्ड ट्रम्प

0

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले, या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण असून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

ट्रम्प म्हणाले, आमचे सरकार दोन्ही देशाच्या संपर्कात आहे. आशा आहे, की काश्मीरमधील अशांतता लवकरच संपेल. भारताने या हल्ल्यात त्यांचे 50 जवान गमावले आहेत. आता भारत पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्याची तयार करत आहे.

‘सध्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंध धोकादायक झाले असून अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ही वाईट परिस्थिती लवकरच संपेल अशी आशा करतो. पाकिस्तानने भारताच्या अनेक लोकांवर हल्ला केला आहे. असे हल्ले त्वरित बंद व्हायला हवेत. आम्ही या परिस्थितीवर चर्चा करत आहोत. या चर्चेत अनेक देशांचा समावेश आहे. दोन्ही देशातील हा तणाव कमी करणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे.’

14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटाने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करून गोळीबार केला. या हल्ल्यात 40 जवाव शहीद झाले. भारतावर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.