‘ईडी’ला वर्षा राऊतांचे पत्र, चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती

राष्ट्रवादीने ईडी हा भाजपचा पोपट असल्याची प्रतिक्रिया

0

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली. यानंतर त्यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण त्या आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे समोर आले. वर्षा राऊत यांनी यासंदर्भात ‘ईडी’ला पत्र लिहून माहिती दिली.

आज ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणे शक्य नसल्याचे वर्षा राऊत यांनी ‘ईडी’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले. यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी त्यांनी ‘ईडी’कडे मागितला.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आले. आज  २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं. सुमारे महिन्यापूर्वीच ईडीची नोटीस वर्षा राऊत यांना पाठवण्यात आल्याची आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ईडीने समन्स बजावले. यानंतर संजय राऊतांनी आपल्या नेहमीच्या शैलीत ट्वीट करत भाजपला टोला लगावला. आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम, असे ट्विट संजय राऊत यांनी केले तर ईडी हा भाजपचा पोपट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीने दिली.
वर्षा राऊत यांच्या बँक अकाऊंटवर काही पैसे जमा झाल्यासंदर्भात त्यांना खुलासा करायला ईडीच्या नोटीशीमध्ये सांगण्यात आले होते. पण अजूनही ईडीचे समन्स आले नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी  सांगितले की, जेव्हा समन्स माझ्यापर्यंत पोहोचेल, तेव्हा नक्की सांगेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. पण त्याचवेळी संजय राऊत यांनी हे सूचक ट्विटही केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.