देशव्यापी संपात वाळूज महानगर येथील विविध कामगार संघटना सहभागी

केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी धोरणांचा कामगारांकडून निषेध

0

औरंगाबाद  : वाळूज महानगर येथील कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृति समिती च्या वतीने देशव्यापी संप  २६ नोव्हेंबर २०२० रोजी पुकारला हाेता . केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी जनविरोधी धोरणांचा निषेध करण्याकरिता  हा संप करण्यात आला.

वाळूज एमआयडीसी भागात ओयासिस चौक ते गुडईअर चौकापर्यंत  मानवी साखळीसह निदर्शने करत कामगारांनी या संपात सहभाग नाेंदवला. यावेळी विविध संघटनांचे कामगार यांचा सहभाग पाहावयास मिळाला.  कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने झालेल्या संपात सीटू, आयटक, इंटक, एच . एम .एस, भारतीय कामगार सेना, मराठवाडा औद्योगिक व जनरल कामगार संघटना, न्यू पँथर पावर कामगार संघटना, पँथर पावर कामगार संघटना, महाराष्ट्र कामगार विकास संघटना, संघर्ष जनरल श्रमजीवी कामगार संघटना सह अनेक संघटनांनी सहभाग नोंदवला. कामगारांनी विविध घाेषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला. जर केंद्र सरकारने कामगार विराेधी धाेरणात बदल केला नाही तर यापुढे माेठे आंदाेलन उभारु, असे काँ. शंकर ननुरे यांनी  सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.