पीडितेचे वेगवेगळे मेडिकल अहवाल, एकात बलात्कार तर दुसऱ्यात धक्कादायक माहिती

फॉरेन्सिक मेडिसीन विभागाच्या माहितीनुसार, हल्ला झाल्यावेळी पीडित शुद्धीत नसल्याचा उल्लेख

0

हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथं घडलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पीडित तरुणीने जखमी अवस्थेत एका व्हिडीओच्या माध्यमातून तिचे लैंगिक शोषण झाले असल्याची माहिती दिली होती.

याच्या आठ दिवसांनंतर, अलीगडच्या रुग्णालयात पीडितेच्या वैद्यकीय-कायदेशीर तपासणीत खासगी भागात, ‘कम्पलीट पेनिट्रेशन’, ‘गळा आवळला’ आणि ‘तोंड बांधले’ असा उल्लेख केला गेला होता. आता त्याच रुग्णालयाचा आणखी एक अहवाल समोर आला आहे, ज्यात खळबळजनक माहिती देण्यात आली आहे.अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजने  त्यांच्या अंतिम अहवालात फॉरेन्सिक विश्लेषणाचा हवाला देत पीडितेवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं म्हटलं आहे. 22 सप्टेंबरच्या मेडिको लीगल प्रकरणा अहवालात, बलात्काराचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याच्या यूपी पोलिसांच्या दाव्यांचा विरोध केला आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पीडित तरुणीच्या नमुन्यांमध्ये शुक्राणू किंवा वीर्य आढळले नसल्याचे माध्यमांसमोर म्हटले होते. जेएनएमसीच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झाला त्यावेळी पीडित तरुणी शुद्धीत नव्हती, असा उल्लेख करण्यात आला आहे. एकीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेचा स्कार्फने गळा दाबण्यात आला होता. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, चार संशयितांची नावं समोर आली होती. एमएलसीच्या अहवालानुसार पीडितेचं तोंड दाबण्यात आले होते आणि तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी तिच्यावर हल्लाही करण्यात आला होता. अहवालामुसार, पीडितेच्या गळ्यावर जखमा होत्या, पण तिच्या गुफ्तांगमार्गात कुठलीही जखम न झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कम्पलीट पेनिट्रेशन
दुसरीकडे, एमएलसीने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला ‘कम्पलीट पेनिट्रेशन’ चा सामना करावा लागला होता. यामध्ये पीडितेच्या शरीरावर आणि कपड्यांमध्ये वीर्यचे नमुने असल्याचे नमूद करण्यात आले होते. पीडित मुलीवर 14 सप्टेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता. 22 सप्टेंबरला दुपारी 1.30 वाजता तपासणी अहवाल पूर्ण झाला. तपासणी करणार्‍या डॉक्टरांच्या माहितीनुसार पीडितेवर जबरदस्ती केली गेली होती.

अंतिम अहवालामध्ये माहिती बदलली
10 ऑक्टोबरला हाथरस जिल्ह्यातील सदाबाद पोलिस स्टेशनमध्ये लिहिलेल्या पत्रात पीडित तरुणीवर लैंगिक बलात्कार झाला नाही ,असा निष्कर्ष काढण्यात आला यामध्ये ‘गुफ्तांगमार्गासंबंधी किंवा लैंगिक अत्याचारासंबंधी कोणतीही माहिती दिली नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.