वडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजांत तेढचा प्रयत्न, मेटेंचा आरोप

'आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी राज्य सरकारची अवस्था

0

सातारा : मराठा आरक्षणाबाबत योग्य दिशा ठरविण्याकरिता आणि मराठ्यांची एकजूट वाढवण्यासाठी येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन केले आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या बैठकीचे निमंत्रण छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीवर जोरदार निशाणा साधला.

मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने घेण्याचे काम हे सरकार करत नाही. मराठा समाजामध्येही एकजूट दिसून येत नाही. त्यामुळे येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यात संपूर्ण राज्यातील मराठा समाजातील प्रमुख मंडळी एकत्र आणण्याचे काम केले जाणार आहे. यावेळी ‘मराठा विचार मंथन’ बैठकीच्या माध्यमातून पुढील काळात मराठा आरक्षणाबाबत नेमकी दिशा काय असणार हे यात ठरवले जाणार आहे, अशी माहिती विनायक मेटे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी आणि मराठा समाजात काही नेते मंडळी तेढ निर्माण होतील, असे वक्तव्य करत आहेत. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हेच पुढाकार घेत आहेत. वडेट्टीवारांसारखी मंडळी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचे काम करत असल्याचा आरोप मेटे यांनी केला. ‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था आहे, असेही विनायक मेटे म्हणाले.” “मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर गृहखात्यापाठोपाठ आरोग्य खात्यानेही भरती काढली आहे. ही दोन्ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत आणि तेच भरती काढत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मात्र आरक्षणावर मार्ग काढायचा आहे, असे म्हणतात, पण त्यावर मार्ग काढत नाहीत. याबाबत त्यांना मी अनेकदा बोललो आहे. ते राज्यातील छोटे-छोटे प्रश्न सोडवतात मग हा आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाहीत,” असा सवाल मेटेंनी उपस्थित केला. “हे राज्य हा देश..हिंदवी स्वराज्य..हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. अशा थोर व्यक्तींचे वंशज त्यांच्या गादीला आदर आहे. अशा व्यक्तींनी समाजाला दिशा द्यावी यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले हे यातून योग्य मार्ग काढतील यासाठी “मराठा विचार मंथन” बैठकीच्या निमंत्रणासाठी साताऱ्यात आलो असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.” “महाविकास आघाडी सरकारमध्ये मराठा समाजाचे नेते आहेत. ते आरक्षणाबाबत पुढाकार घेत नाहीत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘मातोश्री’च्या बाहेर पडत नाहीत आणि त्यांना कोणी चांगला सल्ला देत नाही,” असा मिश्किल टोला विनायक मेटेंनी लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.