विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार!

शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड

0

मुंबई : राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी स्वतः फोनवरुन चर्चा केली होती. दरम्यान उर्मिला यांनी शिवसेनेला होकार दिला आहे.

राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी स्वतः फोनवरुन चर्चा केली होती. दरम्यान उर्मिला यांनी शिवसेनेला होकार दिला. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, उर्मिला यांनी यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शिवाय त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडी सरकारने 12 जणांच्या नावांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली. यामध्ये एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.