अज्ञाताने जाळली शेतात कापून रचलेली सोयाबीनची गंजी

डोळ्यादेखत गंजी जळाल्याने त्यांना अश्रू अनावर, पालममधीील धनेवाडी येथील प्रकार,

0

पालम : पालम तालुक्यातील धनेवाडी येथे कापून रचलेली दीड बॅग सोयाबीनची गंजी अज्ञाताने जाळली. ही घटना पालम तालुक्यातील धनेवाडी येथे ७ सप्टेंबर रोजी रात्री घडली.  धनेवाडी येथील  शेतकरी मसाजी व्‍यंकटी बंडगर (वय ६५)  त्यांचे नाव. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. जवळपास 50 ते 60 हजारांचे त्यांचे नुकसान झाले.

धनेवाडी येथील शेतकरी मसाजी व्‍यंकटी बंडगर (वय ६५) यांना चार एकर शेती आहे. त्यातील दोन एकरवर सोयाबीनची पेरणी केली होती. त्यांनी बियाणे, खत, निंदणी, खुरपणी, कापणीसाठी मोठा खर्चही केला. चार दिवसांपूर्वी सोयाबीन कापून त्याची गंजी त्यांनी लावली. आगामी दोन दिवसांत त्याची काढणी करणार होते. दुर्दैवाने 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री  बंडगर झोपेतून उठले असता, सोयाबीन ची गंजी जळत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न अपयशी ठरला. त्यांच्या डोळ्यादेखत गंजी जळाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. जवळपास 50 ते 60 हजारांचे त्यांचे नुकसान झाले. अन्य उत्पन्नाचा दुसरा स्त्रोतही त्यांच्याकडे नाही. मोजून चार एकर शेती आणि तीन मुले त्यांना आहेत. तद्नंतर याची तक्रार गंगाखेड पोलिसात देण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया श्री बंडगर यांनी दिली. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.