केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा दावा, पुढील दोन महिन्यांंत राज्यात भाजपचे सरकार

फडणवीसांचा कानाला खडा म्हणाले, योग्यवेळी शपथ घेऊ

0

परभणी : विधानसभा-लोकसभेनंतर राज्यात पदवीधरच्या रूपाने पहिलीच निवडणूक होत आहे. आम्ही सारी गणिते मांडली  आहेत,  आता फक्त या निवडणुकीची वाट पाहत होतो. आगामी दोन ते तीन महिन्यांत राज्यात भाजपचे सरकार येणार, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

पदवीधर निवडणुकीसाठी सोमवारी अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. पदवीधरची निवडणूक हरलो तर राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होत नाही. मात्र, ही निवडणूक जिंकलो तर राजकारणात वारे कोणत्या दिशेने वाहते हे लक्षात येईल,असे ते म्हणाले.

फडणवीसांचा कानाला खडा म्हणाले, योग्यवेळी शपथ घेऊ

औरंगाबाद | एक वर्षापूर्वी म्हणजे २३ नाेव्हेंबर २०१९ राेजी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेच शपथ घेतली हाेती. मात्र, या शपथविधीमुळे हातची सत्ता गमावून बसलेल्या फडणवीसांनी आता पहाटेच्या शपथविधीच्या नावाने कानाला खडा लावला आहे. सोमवारी फडणवीस औरंगाबादेत होते. या वेळी पहाटेच्या शपथविधीबद्दल पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, असल्या गोष्टी लक्षात ठेवू नये हेच चांगले. पण यापुढे पहाटेच्या वेळी शपथ घेणार नाही, तर योग्य वेळी शपथ घेऊ, असे ते म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.