‘एमजीएम’ विद्यापीठाला स्वतंत्र संशोधन केंद्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

स्वदेशी, स्वावलंबन या गांधी विचाराला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास देशाचे आर्थिक चित्र बदलेल!

0
औरंगाबाद  :  महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘टेक्निकल एक्सलन्स सेंटर’च्या उदघाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्ज्ञाहणाले की, ज्ञान आणि कौशल्ये यांची सांगड घालूनच विकासाचा मार्गाने जाता येऊ शकते. एमजीएमचे हे टेक्निकल एक्सलन्स सेंटर याची पायाभरणी करणारे ठरू शकते. याच अनुषंगाने ‘एमजीएम’ला स्वतंत्र संशोधन केंद्र देण्याची घोषणा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘टेक्निकल एक्सलन्स सेंटर’च्या उदघाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्ज्ञाहणाले की, ज्ञान आणि कौशल्ये यांची सांगड घालूनच विकासाचा मार्गाने जाता येऊ शकते. एमजीएमचे हे टेक्निकल एक्सलन्स सेंटर याची पायाभरणी करणारे ठरू शकते. याच अनुषंगाने ‘एमजीएम’ला स्वतंत्र संशोधन केंद्र देण्याची घोषणा करत असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था चिंता करण्यासारखी आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचा जीडीपीत ३० टक्के वाटा आहे. हा वाटा ४० टक्क्यांपर्यंत नेऊन निर्यात ६० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून ११ कोटी रोजगार तयार झाले आहेत. स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात कोणते धोरण राबवता ते महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी द्रष्टे नेते होते. देशात अधिक उत्पादनाची गरज असल्याचे त्यांचे मत होते. स्वदेशी, स्वावलंबन या गांधी विचाराला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास देशाचे आर्थिक चित्र बदलेल, असे गडकरी म्हणाले. स्वदेशी म्हणजे मागासलेपण नसून आधुनिक ते स्वीकारताना स्वदेशी नाकारणे योग्य ठरणार नाही. भारतात अगरबत्तीची काडीसुद्धा तैवान, इंडोनेशियातून आयात होते. हा चार हजार कोटींचा व्यापार होता. अधिकचा कर लावून ही आयात थांबवली. आता भारतातच काड्यांची निर्मिती होऊन २५ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, अगरबत्तीच्या काड्यासाठी योग्य बांबू नसल्याने आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आयात थांबवून निर्यात वाढल्यास देशाच्या उत्पन्नात वाढ होईल’, असे गडकरी म्हणाले.
एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम म्हणाले, महात्मा गांधी मिशनचा मागील 38 वर्षांचा विस्तार सर्वांच्या सहकार्यामुळे पूर्ण होऊ शकला. अत्यंत नवीन संकल्पना अंकुशराव कदम यांनी पूर्णत्वास नेल्या. एखाद्या शिक्षण संस्थेचे सर्वात मोठे भांडवल नि:स्वार्थ वृत्तीने काम करणारा मनुष्यबळ असतो आणि असे नि:स्वार्थ कर्मचारी लाभणे ‘एमजीएम”चे भाग्य आहे. सध्या सर्वच संस्था अडचणींचा सामना करत आहेत. पण, त्यांचे रूपांतर संधीत करून वाटचाल करणे गरजेचे आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, एमजीएममध्ये तंत्रज्ञान उत्तमता  केंद्राची उभारणी होणे, हे केवळ एमजीएमच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले असलेले नवदालन आहे. यातून अधिक सक्षम अभियंता घडतील, यात शंका नाही. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीच्या गरजेनुसार कौशल्ये शिकवण्यासाठी हे केंद्र कटीबद्ध असेल. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी या केंद्रातील विविध सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
डॉ.गीता लाठकर म्हणाल्या, हे परिवर्तन, विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान जग आहे. आशा परिवर्तनाच्या काळात आपण शैक्षणिक संस्था म्हणून बदलायला हवे, ही गरज आम्ही लक्षात घेतली. दर 20 मिनिटांनी या जगातील माहिती दुप्पट होत आहे. त्यामुळे अशा माहितीच्या युगात तितके ह सक्षम अभियंता तयार व्हावेत, अशी तयारी शैक्षणिक संस्था म्हणून आपल्याकडून होणे गरजेचे आहे. जर तुम्हाला शिक्षक बनायचे असेल तर तुम्ही कायम शिकत राहायला पाहिजे. अभियंता बनायचे असल्यास कायम अद्ययावत असायला पाहिजे. नेमकी याची गरज ओळखून आम्ही हेक्सॉगॉन, एमएससी आणि एससिग्मा यांच्या सहकार्याने या केंद्राची उभारणी केली. यात विविध अभ्यासक्रम शिकवले जातील.
सुदर्शन लाठकर (सीईओ, एससिग्मा) म्हणाले, मी अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना शिक्षण आणि इंडस्ट्री यात असलेला असलेला कौशल्यत्मक भेद माझ्या लक्षात आला. तेव्हाच मी ठरवले होते की, भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केला होता आणि हे केंद्र त्याच प्रयत्नाचा भाग आहे.
उमेश दाशरथी, (संस्थापक, ऋचा इंडस्ट्री) म्हणाले, हे केंद्र केवळ विद्यार्थी, एमजीएम किंवा मराठवाड्यासाठीच नव्हे तर जगभरासाठी महत्वाचे आहे. मॅकेन्झिच्या अहवालानुसार, 20 असे तंत्रज्ञान आहेत जे जगाच्या संपूर्ण भविष्यावर प्रभाव टाकू शकतात. त्यांचे अध्ययन आणि अध्यापन या केंद्रात होणार आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. जगातील ऑटोमोबाईल जगताचा व्यवसाय 4 ट्रीलीयन डॉलरवर पोहोचला आहे. अशा या काळात त्यानुरूप अभ्यासक्रम एमजीएममध्ये या माध्यमातून सुरू होणे, गौरवाची बाब आहे. यावेळी राजेंद्र अभंगे ( सीईओ, गॅब्रेल) आणि श्रीधर धर्मराजन (कार्यकारी उपाध्यक्ष) यांनीही भावना व्यक्त केल्या. यावेळी एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, डॉ. पी. एम. जाधव, एमएससी सॉफ्टवेअर कंपनीचे उपाध्यक्ष श्रीधर धर्मराजन, उद्योजक उमेश दाशरथी, डॉ. राजेंद्र अभंगे, कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, प्रताप बोराडे, प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, डॉ. गीता लाटकर, डॉ. सुधीर कदम, डॉ. नितीन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सरफराज अली, प्रा.दीपा देशपांडे यांनी तर आभार डॉ. विजया मुसांडे यांनी मानले.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.