जानेवारीपासून ‘मुलांना समजून घेताना’ अभियान राबवणार !

0

औरंगाबाद :  मुलांच्या मानसिक आरोग्य जडणघडणीत शिक्षक आणि पालक यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्या दृष्टीकोनातून गाव तेथे मानसोपचार अभियानांतर्गत राज्यभरातील मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन ‘मुलांना समजून घेताना’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान वीस मानसोपचार तज्ज्ञ गावागावांतील शाळेमध्ये जाऊन शिक्षकांसाठी कार्यशाळा घेणार आहेत, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख यांनी दिली.  डॉ. देशमुख म्हणाले की, गाव तेथे मानसोपचार राज्यव्यापी अभियानाच्या वतीने, हा तिसरा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्वात प्रथम ‘उदासीनता’ त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ‘ स्क्रिझोफ्रेनिया’ या मानसिक आजारावर भव्य अभियान राबवित जनजागृती करण्यात आली. यावर्षी नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यभरातील दोनशे डॉक्टरांनी ‘मुलांना समजून घेताना’ पालक आणि शिक्षकांची असलेली भूमिका या विषयावर जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीपासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे लहान मुलांमधील मानसिक समस्यांचे लक्षणे कशी असतात, कशा पद्धतीने शिक्षक प्राथमिक स्तरावर तो सोडवू शकतो. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या उपक्रमात औरंगाबाद शहरातील डाॅ. अमोल देशमुख, डॉ. विक्रांत पाटणकर, डॉ. चिन्मय बाऱ्हाळे, डॉ. सुश्रुत पाटील, डॉ. निखिल खेडकर, डॉ. फैजल खिल्जी, डॉ. सना खिल्जी, डॉ. एल. आर. खान. डॉ. कुरेशी, डॉ. हासीफ फारुखी सह अन्य डाॅक्टरांचा समावेश राहणार आहे. भविष्यातील पिढी मानसिकरीत्या सक्षम व्हावी यासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी स्वेच्छाने हा उपक्रम हाती घेतला आहे, असेही डॉ. अमोल देशमुख यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.