उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे वेगळीच मागणी, राज्यातील भाजप नेत्यांबद्दल तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजप नेत्यांवरील नाराजी व्यक्त

0

मुंबई : ‘कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधानतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जिवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी,’ अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजप नेत्यांवरील नाराजी व्यक्त केली.

काही राजकीय पक्ष जनतेच्या जिवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी,’ अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजप नेत्यांवरील नाराजी व्यक्त केली. लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘कोविड’चा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्लीत, केरळमध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी 24 हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता 4700 ते 5000 रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात. कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते, याकडेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचा परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.