खडसेंच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पण शिवसैनिकांची भावना काय?

खडसे यांच्या निर्णयाचे स्वागत असले तरी उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार मात्र नाराज

0

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार मात्र नाराज आहेत.”एकनाथ खडसे यांच्या मुलीला मी निवडणुकीत पराभूत केले आहे. माझा आणि खडसेंचा जुना राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे आता ते महाविकास आघाडीमधील एका पक्षात आले तरी संघर्ष अटळ आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार मात्र नाराज आहेत.”एकनाथ खडसे यांच्या मुलीला मी निवडणुकीत पराभूत केले आहे. माझा आणि खडसेंचा जुना राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे आता ते महाविकास आघाडीमधील एका पक्षात आले तरी संघर्ष अटळ आहे.याची कल्पना मी आधीच वरिष्ठांना दिली होती,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. यासंदर्भात आपण गुरुवारी (22 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, “आज दिवसभर मी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; पण ते व्यस्त होते. त्यांनी मला भेटीसाठी उद्याची वेळ दिली आहे. तसेच उद्धव ठाकरेंशीही पुन्हा एकदा चर्चा करणार आहे.””खडसेंचं राजकारण वर्चस्वाचे आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच सत्ताधारी पक्षात येत असल्याने आमदार म्हणून माझे अधिकार आणि निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणार. “उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेना हा जुना संघर्ष आहे. हा संघर्ष 2014 मध्ये टोकाला गेला. शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी एकनाथ खडसेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेतला होता. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात उलथापालथ होणार आहे. शिवसेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने आणि स्थानिक आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, ” आम्हाला तर खडसेंनी कायम त्रास दिला आहे. यापुढेही देतील हे आम्ही गृहीत धरले आहे. त्यामुळे आतापर्यंत नडलो तसेच पुढेही नडू.”खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या एकच आमदार आहे. साधारण 2009 पर्यंत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 पैकी 5 आमदार होते. पण कालांतराने ही संख्या घटत गेली. शिवसेनेने मात्र आपले पाच आमदार कायम राखण्यात यश मिळवले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेसोबत संबध बिघडणार? खडसेंना मंत्रिमंडळात जागा देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद आहेत का? एकनाथ खडसेंच्या पक्षांतराचे परिणाम महाविकास आघाडीत कसे होऊ शकतात?

शिवसेना आणि एकनाथ खडसे यांच्या संबंधात तणाव का?

सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2014 च्या घटस्थापनेच्या काही दिवस आधी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत 25 वर्षांची भाजप आणि शिवसेनेची मैत्री संपुष्टात आल्याचे खडसेंनी जाहीर केले. 2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या घटस्फोटाचे कारण शिवसेनेच्या अवास्तव मागण्या असल्याचे सांगितले. शिवसेना आणि एकनाथ खडसेंमधील अंतर यामुळे आणखी वाढत गेले. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे प्रबळ नेते म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख आहे. पण शिवसेना आणि भाजपची युती असूनही स्थानिक पातळीवर मात्र खडसे आणि सेनेच्या नेत्यांमध्ये उघड वैर आहे. युतीच्या उमेदवारांना संपूर्ण जिल्ह्यात मदत करू, पण खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघात मदत करणार नाही, अशी उघड भूमिका यापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.