उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, दिले सूचक उत्तर

राज्यपालांचे बैठकीचे आयोजन, सरकारमधील एकही मंत्री इकडे फिरकला नाही

0

मुंबई : कोरोनाशी लढा देण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याची तक्रार देवेद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. त्यांच्या या तक्रारीनंतर राज्यपालांनी बैठकीचे आयोजन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले, मात्र मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला अनुपस्थिती दाखवली तसेच त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री या बैठकीकडे फिरकला नाही. हा राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला दणका मानला जात आहे. भाजप नेत्यांच्या आरोपांनंतर राज्यपाल बैठक लावत असतील तर अशा राजकारणाला उद्धव ठाकरे यांनी सूचक उत्तर दिले आहे. सोबतच त्यांनी आपले स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना या बैठकीला पाठवून तेथील घडामोडींवर नजर देखील ठेवली. दरम्यान, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर, प्रदीप व्यास, मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांना राज्यपालांनी काही सूचना केल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.