मार्निंग वॉकसाठी जाणाऱ्या 2 महिलांना वाहनाची धडक, एक ठार एकजण गंभीर जखमी 

0

वाळूज : येथील दोन महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात एक महिला ठार तर एक जखमी झाली आहे. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास वाळूजवळील औरंगाबाद-नगर महामार्गावर घडला. दरम्यान धडक देणारे वाहन अपघात घडताच घटनास्थळावरून पसार झाले आहे.

वाळुज येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगरमध्ये राहणारी जुबेदा शेख (वय 45 )आणि महामार्गालगत राहणाऱ्या नंदाबाई राऊत या दोघी सोमवारी पहाटे साडेपाच वाजेदरम्यान औरंगाबाद-नगर महामार्गावरुन मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या. या दरम्यान औरंगाबादहून गंगापूरच्या दिशेने जाणा-या भवधाव अज्ञात वाहनाने त्या दोन्ही महिलांना जोराची धडक दिली.

या अपघातात शेख जुबेदा ही महिला जागेवरच बेशुध्द झाली. या अपघाताची माहिती वाळूज पोलिसांना कळताच सहायक फौजदार नारायण बुट्टे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी गंभीर जखमी जुबेदा जलील शेख यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

तर जखमी नंदाबाई बाळू राऊत (वय 50) यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले असून, त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला फौजदार प्रिती फड करीत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.