हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडी आक्रमक

धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा - उमा खापरे

0

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र् भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंविरोधात एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचे कबूल केले आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र् भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी मागणी केली आहे. धनंजय मुंडेंविरोधात एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचे कबूल केले आहे.हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.“सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल” असे पत्र उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. इतकेच नाही तर सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला. मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचा मंत्री बायको लपवतो, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.तरुणीने ओशिवरा पोलिस ठाण्यात 10 जानेवारी रोजी तक्रार केली होती. या प्रकरणी 11 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. 2006 पासून अत्याचार सुरू असल्याचा दावा तिने केला आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या तक्रारीबाबत समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
धनंजय मुंडे नेमके काय म्हणाले?

समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणू शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्ख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहेत. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी, अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असेही धनंजय मुंडेंनी सांगितले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.