भरधाव ट्रव्हल्सची दुचाकीस धडक, आईसह चार महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

वर्ध्यातील सावंगी ते दत्तपूर बायपास मार्गावरील सैनिकी ढाब्यासमोर घडला अपघात

0

वर्धा :  वर्ध्यातील सावंगी ते दत्तपूर बायपास मार्गावरील सैनिकी ढाब्यासमोर हा अपघात घडला. भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात. यात दुचाकीवरील आई आणि चार महिन्यांचा चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर या मुलाचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वर्ध्यातील सावंगी ते दत्तपूर बायपास मार्गावरील सैनिकी ढाब्यासमोर हा अपघात घडला. शीतल भूषण सावध  (29) आणि अंशू भूषण सावध (4 महिने) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमी असलेल्या पती भूषण सावध यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मांडवा येथील भूषण सावध त्यांची पत्नी आणि मुलासह दुचाकीने सावंगीकडून मांडवा येथे घरी जात होते. दरम्यान, सैनिक ढाब्याच्या जवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमुळे ती दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत नेली. त्या तिघांनाही जबर दुखापत झाली. या अपघातात शीतल सावध आणि मुलगा अंशू सावध यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर भूषण सावध यांना गंभीर दुखापत झाली आहे. यातील मृत महिला ही सैन्यात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची येत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.