कन्नडमधील तलावात पोहायला गेलेल्या दोन बहिणींचा बुडून मृत्यू

दोन चुलत बहिणींच्या मृत्यूने गावावर पसरली शोककळा

0

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील खामगावात दोन चुलत बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  घडली. या दोघीही तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला.  पण त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.  ऋतुजा कवडे आणि आरती कवडे, अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू  आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील खामगावात ही घटना घडली. ऋतुजा कवडे आणि आरती कवडे अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.  कोरोनाच्या संकटात गेले अनेक महिने कोणीही घराबाहेर पडले नाही. त्यामुळे गावात तरुण-तरुणांची अशी मज्जा सुरूच असते. पण दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.  या दोघीही तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या.  पोहण्यासाठी गेलेल्या  दोन्ही चुलत बहिणींना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यात तलाव तुंडूब भरलेले होते. त्यामुळे खोलीकरणामुळे त्यांना पोहता आले नाही आणि अशात दोघींचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना समजताच तात्काळ पोलिसांना  कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघींचेही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी  ऋतुजा आणि आरतीचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.  दरम्यान, घरातील हसत्या-खेळत्या मुलींचा, असा अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.